जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२५
पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केला, ही धक्कादायक घटना उत्तराखंड आणि पोलीस वसाहतीमध्ये घडली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरुन देवेंद्रसिंग कुवरसिग जिना (वय ४५. रा. गोधरा हरिपूर, जि.नैनीताल, उत्तराखंड) या तिच्या सावत्र पित्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला मुलीसह वास्तव्यास असून त्या महिलेने गेल्या तीन वर्षांपूर्वी उत्तराखंड येथील देवेंद्रसिंग जिना (वय ४५, रा. गोधरा हरिपूर, जि. नैनीताल, उत्तराखंड) याच्यासोबत विवाह केला आहे. सन २०२४ मध्ये दिवाळीच्या सुट्टी चालविण्यासाठी पीडित मुलगी तिच्या आईसोबत उत्तराखंड येथे गेली होती. तेथे पंधरा दिवस राहिल्यानंतर त्या जळगावात परतल्या, त्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर पीडितेच्या सावत्र वडीलांनी तिचे बाथरुममधील अंघोळ करतांनाचे व्हिडीओ पाठविले. त्यामुळे पीडिता ही प्रचंड घाबरून गेली होती. त्यानंतर पीडिता ही तिच्याआई व दोघ मामांसह उतराखंड गेलेले होते, त्यावेळी कामानिमित्त बाहेर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चार ते पाच दिवस तेथे थांबल्यानंतर ते पुन्हा जळगावाला परतले.
त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये पीडितेचे वडील हे जळगावातील पोलीस वसाहतीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या घरी आले. याठिकाणी महिनाभर थांबलेले असतांना त्यांनी पीडितेची आई ड्युटीवर गेलेली असतांना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये देखील तिच्यावर अत्याचार केला होता. पीडिता ही तिच्या मावशीकडे गेलेली असतांना त्यावेळी तिच्या वडीलांनी दारु का पिले असे बोलली, गावेळी त्यांनी पीडीतेवर ओरडून तू जास्त बोलू नको नाही तर तुझे व्हिडीओ दाखवू का असे म्हणाले. दरम्यान, तिच्या आईने तिला विश्वासात घेवून विचारले असता, पीडितेने आईसमोर संपुर्ण घटना कथन केली. तसेच तो व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे सांगितले.




















