जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२२
रावेर तालुक्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारणा झाली तेव्हा, तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला.
डांबून ठेवत वारंवार बलात्कार
याबाबत १७ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान, पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, यासह दोघांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर पाल येथील निर्जनस्थळी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केला. रावेर येथे संशयित आरोपी रवि छपरीबंद याने त्याच्या घरी डांबुन ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, वारंवारं बलात्कार केलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पिडीतेने स्वत:ची सुटका केल्यावर देखिल चौघां संशयित आरोपींनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर पिडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. यानंतर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फिर्यादी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमा सोबत लावून दिले. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर यांच्यासह चार जण (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे हे करीत आहेत.