जळगाव मिरर | २० जुलै २०२५
एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले असतांना तेथे असलेल्या इसमाने हातचालाखी करीत एटीएमकार्ड बदलावून सुधाकर पंडीतराव सुरसे (वय ६४, रा. शाहूनगर) यांच्या बँक खात्यातून ४८ हजार ३०० रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना दि. १२ रोजी शहरातील विसनजीनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहूनगरातील टेकावडे गल्लीत सुधाकर पंडीतराव सुरसे हे सेवानिवृत्त शिपाई वास्तव्यास आहे. दि. १२ रोजी सायंकाळच्या सुमारास साडेसहा वाजेच्या सुमारास विसनजी नगरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये त्यांच्या पत्नीच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकून पीन नंबर टाकून रक्कम टाकली. परंतु पैसे न निघाल्याने त्याच वेळी शेजारी असलेला ३५ वर्षीय अनोळखी इसमाने त्या मशीनमधून पैसे निघत नाही, बाजूच्या मशिनमधून पैसे काढा असे सांगितले. त्यावर सुरसे यांनी ह्या मशिनमधून मला पैसे काढता येत नाही, यावर त्या इसमाने तुम्ही कार्ड टाका मी पैसे काढून देतो असे सांगितले.
सुधाकर सुरसे यांनी एटीएममध्ये कार्ड टाकून पण पैसे निघाले नाही. त्याचवेळी त्या इसमाने हातचालाकीने सुरसे यांचे कार्ड बदलवून दुसरे तसचे दिसणारे कार्ड त्यांच्याकडे देवून तो निघून गेला. दि. १४ रोजी सुरसे हे चेकद्वारे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांना खात्यात केवळ ५० रुपये शिल्लक असल्याचे समजले. बँकेतून पासबुक प्रिंट केल्यानंतर सुरसे यांना त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यणून ४८ हजार ३०० रुपये परस्पर काढून त्यांची फसवणुक केल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे
