जळगाव मिरर | १९ एप्रिल २०२४
रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या आजच्या प्रचाराची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वढोदा जि प गटातून करण्यात आली.
पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रारंभी कुऱ्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना उपस्थित पदाधिकऱ्यांनी माल्यार्पण , अभिवादन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली.
यावेळी ॲड. खडसे म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात सामान्य जनता मेटाकुटीस आली आहेसत्ताधाऱ्यांनी वाढती महागाई, बेरोजगारी,शेतकऱ्यांना प्रश्न सर्व बाबतीत दिलेले आश्वासने फोल ठरले असुन मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार आहे. मोदींजींनी पेट्रोल, गॅसचे भाव कमी करण्याचे दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी एकही आश्वासन पुर्ण झाले नसून गॅस पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे, रोजगार नसल्यामुळे तरुण वर्ग हतबल झाला आहे, एकीकडे शेतमालाला भाव नाही तर, दुसरीकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना शेती कशी कसावी? असा प्रश्न पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे चित्र बदलवण्याची वेळ आता आली असुन यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करावे.’
डॉ जगदीश पाटील यांनी केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर प्रहार करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले. यावेळी उमेदवार श्रीराम पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, भा रा काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, भा रा काँ तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विकास पाटिल, सरपंच डॉ बि सी महाजन, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, दिपक पाटील, युवक तालुका अध्यक्ष मुन्ना बोडे, शिवा पाटील, प्रविण कांडेलकर, छायाताई सवळे, रंजनाताई कोथळकर, माणिक पाटील, संतोष कांडेलकर, वसंता पाटील, संदीप पाटील, संदीप ढिवरे, शंकर मोरे, मयुर साठे, कचरू बढे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.