महिलांचे सौदर्यं वाढविण्यासाठी काम करणाऱ्या अनेक ब्युटीशियनचा व्यवसाय आहे . पण कोविड१९ मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. त्यावेळेस तर सर्वानाच किती स्वच्छ व आरोग्याची काळजी घेत जगावे लागते होते वेळोवेळी हात धूत कोरोनाशी लढा देत होतो. अशा काळातही महिलांनी घरीच सौदर्यंटिप्स जाणून घेत, पुरता दोन वर्षांचा ब्युटी पार्लरचा खर्च वाचविला. तसेच तुम्ही या टिप्सप्रमाणे नेहमी घरीच प्रयोग केले तर नक्की तुमचा पार्लरचा खर्च वाचू शकतोय. जाणून घेऊ आपण ‘जळगाव मिरर’ च्या महिला विशेष भागात.
फेशियल, हेअरकट, आयब्रोज, थ्रेडिंग, व्हॅक्सिंग…..अशा चेहरा, केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविणाऱ्या सेवा देणाऱ्या “ब्युटी पार्लर’
काही उपयुक्त फेस पॅक
दोन चमचे ज्वारीच्या पिठात एक चमचा मध, अर्धा चमचा
दूध, अर्धा चमचा दही घालून लेप तयार करावा. यामुळे
त्वचेतील रंगकणांचा गडदपणा कमी होतो.
दोन चमचे मैदा, अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा आंबेहळद, दोन चमचे दूध, थोडी साय यांचे मिश्रण पॅक स्वरूपात लावल्यास तेलकटपणा कमी होऊन वर्ण उजळतो.
दोन चमचे ओटचे पीठ, एक चमचा मध, अर्धा चमचा दही, थोडी हळद एकत्र करून लावल्यास सैल त्वचा आवळली जाते.
गव्हाचे पीठ चाळल्यानंतर उरणाऱ्या कोंड्यात दही अथवा दूध मिसळून लावल्यास चांगले परिणाम मिळतात. हा लेप स्क्रबरसारखे काम करतो.
घरीच वाढवा सौदर्यं
बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.
हातापायांसाठी लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लावू नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्ध लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.
पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून घ्या. त्यात थोडं दही घाला. लिंबाचा रस आणि मध घाला. चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने धुवून टाका.
हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.
ओट्स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.
