जळगाव मिरर | ७ जुलै २०२३
पीएम केअर फंड सरकारी नाही असे म्हणतात, त्यांची चौकशी होऊ शकत नाही, नेमका हा फंड आहे कुणाचा? पीएम म्हणजे प्रभाकर मोरे फंड आहे का हा? मग सांग वसाड्या पैसा गेला तरी कुठे असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपकडून वारंवार कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात येतो, त्यांची चौकशी करा अशी मागणी करण्यात येते.
ती चौकशी करत असताना पीएम केअर फंडची देखील चौकशी करा. विनाकारण बदनामी करु नका. एखादा व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्यांचे कौतुक करायला माणुसकी लागत असते, तीच जर मेली असेल तर कौतुकाची अपेक्षाच करू नये. पण कौतुक नाही केले तर बदनाम तरी का करताय असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,काढा सर्व राज्यातील कोरोना काळातील कारभाराची चौकशी करा, मुंबई मनपाच्या मागे जा चौकशीचा ससेमिरा लावणार असाल तर पीएम केर फंडाचा पैसा ही कुठे गेला यांची चौकशी व्हायला हवी. लाखो करोडो रुपये तिकडे जमा केले गेले. पीएम केअर फंड सरकारी नाही असे म्हणतात, त्यांची चौकशी होऊ शकत नाही, नेमका हा फंड आहे कुणाचा? पीएम म्हणजे प्रभाकर मोरे फंड आहे का हा? मग सांग वसाड्या पैसा गेला तरी कुठे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की,हल्ली ज्या शिल्पकारांने घडवले तोच पळविण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे स्वत:चे कर्तृत्व काहीच नाही स्वत: शिल्पकार होऊच शकत नाही, पण ज्यांनी घडवले आहे तोच पळवून न्यायचा असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह अजित पवार यांच्या गटाला लगावला आहे.