
जळगाव मिरर / २ डिसेंबर २०२२
श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय येथे बुधवार दि. 30 रोजी “विज्ञान तथा साहित्य प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी सेवा मंडळाचे सभापती आ. श्री. रमेश नागराणीजी होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे पदाधिकारी महामंत्री श्रीमती मधुलता शर्मामॅडमजी तसेच कोषाध्यक्ष अँड . तिवारीजी, कार्याध्यक्ष श्री. गोडीयालेजी, श्रीमती आरतीदीदी विद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही. एस. पाठक सर उपप्राचार्य श्री. पी.सी. आठवलेसर ,पर्यवेक्षक श्री. ए. एन. माळीसर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर कार्यक्रमाचे रिबीन कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनी मध्ये विविध विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट केलेले होते. मॉडल्स बनवले होते व उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, मराठी ,हिंदी ,इंग्रजी, इतिहास अर्थशास्त्र, या विषयांवर आधारित आपापली प्रस्तुती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिली गेली. पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनीच्या निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रदर्शनीमध्ये सर्व विषयाच्या शिक्षकांनी खूप मेहनत करून विद्यार्थ्यांकडून मॉडल्स व उपक्रम तयार करून घेतले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खंडेलवाल मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री पाठक सर यांनी केले होते . कार्यक्रमासाठी विशेष मेहनत विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. एम. बी. झंवरसरांनी केली .याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.




















