• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६

क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०) यांची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात झासी प्रवीण पाटील या महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील एका वैद्यकीय फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेले डॉ. शिंदे यांना २९ जानेवारी रोजी Facebook वर झासी पाटील नावाच्या महिलेची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये साधारण संवाद सुरू झाला. काही दिवसांतच संबंधित महिलेने ‘इंटरनॅशनल ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, अशी माहिती देत विश्वास संपादन केला.

९ फेब्रुवारी रोजी तिने पुन्हा संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगितले. गुंतवणुकीसाठी एक लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला डॉ. शिंदे यांनी ७० हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यावर अॅपमध्ये १ लाख ५३ हजार २१ रुपये नफा झाल्याचे दर्शविण्यात आले. वाढता नफा पाहून त्यांनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवली.

विश्वास पूर्णपणे जिंकल्यानंतर ऑनलाइन ठगांनी वेळोवेळी एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपये स्वीकारले. अॅपवर या गुंतवणुकीवर ३ कोटी ९१ लाख ८७ हजार ७६६ रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात येत होते. मात्र, ती रक्कम काढण्याची मागणी केली असता २० टक्के ‘व्हेरिफिकेशन फी’ म्हणून ६५ लाख ३१ हजार २९४ रुपये भरण्याची अट घालण्यात आली.

अतिरिक्त रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगत डॉ. शिंदे यांनी आधी गुंतवलेली रक्कम परत देण्याची विनंती केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत संबंधितांनी पैसे परत देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोठा आणि झटपट नफा, अज्ञात अॅप्स व ‘व्हेरिफिकेशन फी’च्या नावाखाली मागितली जाणारी अतिरिक्त रक्कम ही सायबर फसवणुकीची ठळक लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

Related Posts

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !
क्राईम

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !
क्राईम

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026
संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत
क्राईम

संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत

February 21, 2026
एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई
क्राईम

एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

February 21, 2026
महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !
जळगाव

महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !

February 21, 2026
वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !
जळगाव

वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !

February 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026
फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

February 22, 2026
वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group