जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या बसंतगड भागात गुरुवारी सकाळी १०:३० वाजता एका सीआरपीएफ जवानांचा वाहन २०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुःखद घटना घडली. या अपघातात ३ जवानांचा मृत्यू झाला असून १५ जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यापैकी ५ जवानांची प्रकृती गंभीर आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, सैनिकांच्या पथकाला घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरून घसरले आणि उंच उतारावरून खड्ड्यात कोसळले. घटनास्थळावरून आतापर्यंत २ मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. अनेक जखमी जवान गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले आहेत.
तसेच, १६ जुलै रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्याच्या गुमरी भागात एका मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय इतर ६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही अपघातांनी सुरक्षा दलांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
