• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : सुनेने दिली सासूच्या हत्येची सुपारी ; पोलिसांनी केली उकल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 10, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
खळबळजनक : सुनेने दिली सासूच्या हत्येची सुपारी ; पोलिसांनी केली उकल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नागपूर शहरात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या मोहात चुलत भावांना दोन लाख रुपयांमध्ये सुपारी देत सासूचा खून केल्याची घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैत्री नगरात घडली. यापूर्वी याच परिसरात घडलेल्या पुट्टेवार हत्याकांडाची या निमित्ताने उजळणी झाली. अजनी पोलिसांनी या खुनाचे रहस्य दहा दिवसानंतर शोधून काढले. सुनीता ओंकार राऊत (वय 54 वर्ष) राहणार मित्र नगर असे मृत महिलेचे तर वैशाली अखिलेश राऊत (वय 30), रितेश प्रकाश हिवसे (वय 27) आणि श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (21) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यांचे भाऊ सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊराव मेंढे (वय 57 वर्षे) राहणार शिवाजीनगर हुडकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सुनिता या सून वैशाली अखिलेश राऊत व वैशालीची मुलगी रिद्धीका उर्फ मिस्टी (वय 5 वर्षे) यांच्यासह मित्र नगर येथे राहत होती. सुनीतांचे पती ओंकार यांचे 2016 मध्ये निधन झाले. 2023 मध्ये अखिलेशचा मृत्यू झाला.

28 ऑगस्टला सुनीताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शेजाऱ्यांनी भगवान यांना दिली. भगवान घरी गेले त्‍यावेळी सुनीता पलंगावर निपचित पडलेल्या होत्या. आईला बीपीचा त्रास असल्याने हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असे वैशालीने खोटेनाटे भगवान यांना सांगितले. याच दिवशी रात्री नऊ वाजता माणेवाडा घाट येथे सुनिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वडिलांना चिकनगुनिया झाल्याचे सांगून वैशालीने 27 ऑगस्टला उपचारासाठी शेजारी असलेल्या अरुणा चव्हाण यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले व ही रक्कम तिने ऑनलाईन भाडेकरुच्या खात्यात जमा करायला लावली. भाडेकरू सीता येलेकर यांनी ही रक्कम श्रीकांत हिवसे यांच्या खात्यात जमा केली. मात्र सुनिता यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वैशालीचे वडील हजर होते. ही बाब कळताच भगवान यांना संशय आला व त्यांनी चौकशीला सुरुवात केली. वैशालीच्या मोबाईलची तपासणी केली असता, ती सतत श्रीकांत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सुनिता वैशालीच्या चरित्रावर संशय घ्यायच्या या शिवाय संपत्तीवरूनही वाद व्हायचे अशी माहिती आहे. त्यामुळेच वैशालीने चुलत भावांना दोन लाख रुपये सुपारी देऊन ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.

27 ऑगस्टला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोघे वैशालीच्या घरी आले. त्यांनी मागील दाराने घरात घुसले व सुनिता यांची हत्या केली. सकाळी दोघेही पसार झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार करीत आहेत. यापूर्वी नागपुरात झालेल्या पुट्टेवार हत्याकांडाची या निमित्ताने उजळणी झाली. नगररचना विभागाची गडचिरोली येथे कार्यरत सहाय्यक संचालक अर्चना मनीष पट्टेवार यांनी सुपारी देऊन संपत्तीसाठी सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारखाली चिरडून हत्या केली होती.

Related Posts

जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

इन्स्टाग्रामवर प्रेम… लग्नाचे आमिष अन् तरुणीवर अत्याचार : जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

जळगाव रेल्वे स्टेशनवर बांगलादेशी महिलेचे ‘बिंग’ फुटले : मावशी मोबाईल घेऊन पसार!

October 5, 2026
बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

October 5, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group