जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना नुकतेच दक्षिण मुंबईत खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या तीन भावांनीच १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन भावांबरोबरच शिक्षकाला रविवारी मुंबई विमानतळाजवळून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दक्षिण मुंबईत आठवी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस चालवितात. तिनही भावांविरोधात पीडित मुलीचा विनयभंग, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. शनिवारी दोघांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी मोठा भाऊ रविवारी आई-वडिलांसोबत कुलू मनालीहून परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळाजवळून अटक केली. हा गुन्हा मध्य मुंबईतील एका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आणि नंतर कोचिंग क्लासेस असलेल्या दक्षिण मुंबईतील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
ही मुलगी २०२२ मध्ये शिकवणीला जात होती. त्यावेळी तिच्यासोबत ३५ ते ४० मुले होती. तिच्या वागण्यातील बदल तिच्या आईला जाणवला. तिने मुलीचे समुपदेशन केले असता, तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यातून तिघा भावांच्या गुन्हेगारी कृत्याला वाचा फुटली.