जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२६
अमळनेर तालुक्यातील ढेकू बु. येथील २६ वर्षीय दीपक नाना भिल याला विशेष पोक्सो कोर्टाने अल्पवयीन मुकबधिर मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याबद्दल दोषी ठरवले. त्याला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडातील ७ हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी दीपक नाना भिल (वय २६, रा.ढेकू, ता. अमळनेर) याने त्याच गावातील १६ वर्षीय मुकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपीने वारंवार वेगवेळ्या ठिकाणी हे कृत्य केले. यामुळे पीडित गर्भवती झाली. पीडितेच्या वडिलांनी ३० जानेवारी २०२२ रोजी अमळनेर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा नोंदवला तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी अतिसत्र जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांच्या कोर्टासमोर खटला चालला.
सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी सरकारकडून ९ साक्षीदारांची साक्ष घेतली. पीडित मुलगी ही विशेष बालक असल्याने तिची साक्ष व्हिडिओग्राफीद्वारे बंद खोलीत नोंदवली गेली. विशेष शिक्षक दुभाषिक नेमण्यात आले, ज्यांनी तिला इयत्ता सहावीपर्यंत बोलणे-ऐकणे शिकविले होते. पीडित साक्षीदरम्यान साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या आईची, पोलिस पाटलाची, डॉ. जी. एम. पाटील तपास करून दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले. तदर्थ आणि डॉ. अनिता देशमुख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील अॅड. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करून सर्व पुरावे सिद्ध केले. कोर्टाने आरोपीला दोषी मानले. खटला चालू असताना आरोपी अटकेत होता.




















