
जळगाव मिरर | १२ जून २०२३

प्रत्येक परिवारात सर्वच नाती हि महत्वाची असतात. पण कधी कधी हीच नाती वाईटनजरेने बघितले जात असतांना अशा काही घटना उजेडात येत असतात. धरणगाव तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विनयभंग केल्या प्रकरणी महिलेच्या जेठाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि ११ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास विवाहिता घराच्या मागील रूममध्ये झोपलेली असतांना तिचा जेथ मागील रूममध्ये येत महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले तर त्याला विवाहितेने विरोध केला असता त्यावर विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करीत मी तुझ्या सोबत बळजबरी करेल अशी धमकी सुद्धा यावेळी दिली. या प्रकरणी विवाहितेने धरणगाव पोलिसात धाव घेत जेठ विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहेत.




















