
जळगाव मिरर | ३० मे २०२५
शहरातील प्रभाग क्र.१ मधील दुध फेडरेशन रोड येथे शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसेना भव्य सदस्य नोंदणी अभियान उत्साही वातावरणात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले. हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, शिवम सोनवणे, युवा सेनेचे सनी सोनार, विजय यादव, प्रशांत सोनवणे, चंद्रसेन निकम, भूषण चव्हाण, मोहन भालेराव, विशाल ठाकूर, नागेश निकम, सचिन कापडणे, विनोद सोनवणे, अनिल सावळे, सुदर्शन वाल्हे, शुभम बनसोडे, पंकज पारेराव, कृष्णा माहाले, दुर्गेश पन्हाळे, विनायक लवलखे. मेघना सोनवणे, मंगला श्रीवास्तव, रेखा सपकाळे, सरस्वती पांगारे,विमलबाई चंडाले, प्रभावती शाह, अन्नपूर्णा सपकाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.