
जळगाव मिरर | १ जून २०२३
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. चक्क याठिकाणी बसलेले कर्मचारी नागरिकांचा फोन सुद्धा उचलण्याची तसदी घेत नाही. या कर्मचारीवर वरिष्ठांचे लक्ष असते कि नाही असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राधाकृष्ण नगर परिसरात असेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या ३३/११ के.व्ही.उपकेद्र शिवाजी नगर, जळगाव या कार्यालयातून परिसरातील आज दि. १ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत लाईट बंद करण्यात आलेली होती. यावेळेस परिसरातील अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयातील संबंधित फोन नंबर वर संपर्क साधला असता. हा नंबर कोणत्याही कर्मचारीने उचलण्याची तसदी घेतली नाही तर काही नागरिकांचे फोन उचलले असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिल्याने नागरिकांनी त्रस्त होवून कार्यालयात गेले असता. याठिकाणी दुपारी २ वाजेच्या सुमारास आठ ते दहा कर्मचारी त्याच फोन जवळ गप्पा ठोकत बसलेले होते. यावेळी नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी सांगितले कि आम्ही सर्व फोन उचलत आहे. नागरिकांना सुद्धा त्यांनी खोटे पाडले आहे. या विभागात पावसाळ्याच्या पूर्वी वृक्षतोडीची मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले पण महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून नागरिकांना व्यवस्थित विजेचे जाण्या येण्याचे नियोजन सुद्धा नागरिकांना सांगणे महत्वाचे आहे पण त्यांनी ते तसे केले नाही. याठिकाणी बसलेले काही कर्मचारी स्वतःला मोठे अधिकारी असल्याचे भासवत होते. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.