
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२६
तालुक्यातील जळके येथील एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्पेश समाधान पाटील (वय १९, रा. जळके विटनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कल्पेश याने स्वतःच्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे काका संदीप काशिनाथ पाटील यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. इरफान फारूख यांनी कल्पेशची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.





















