जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५
गुजरात राज्यातील मेहसाणा येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ६ नोव्हेंबर गुरूवार रोजी घरात खेळत असताना केवळ ७ वर्षांची चिमुरडी कपाटात अडकून गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला.घटना कडी येथील करणनगर रोडवरील ‘सुकन बंगला’ या परिसरातील आहे. मृत मुलीचे नाव एषा तुषार सुर्यवंशी असून, तिचे वडील मूळचे महाराष्ट्रातील आहेत. एषा या भुसावळ येथील ज्येष्ठ पत्रकार संतोष शेलोडे यांच्या नात असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेच्या वेळी एषाची आई घराच्या गच्चीवर साफसफाई करत होती. त्या दरम्यान खेळता खेळता एषा कपड्यांच्या कपाटात शिरली. काही वेळाने तिचा आवाज न आल्याने आईने शोध घेतला असता ती कपाटात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची आवश्यकता या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. घरातील अशा बंद कपाटे, फ्रीज किंवा इतर जागा मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे या प्रसंगाने अधोरेखित केले आहे.सुर्यवंशी परिवारावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे .



















