औरंगाबाद : वृत्तसंस्था
औरंगाबादमधील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांसानी टाकलेल्या धाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. चक्क नगरसेवक थेट जुगार अड्ड्यावर सापडल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच एका हॉटेलमध्येच हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. एका नगरसेवकाचाच हा जुगार अड्डा आहे. महत्त्वाचा म्हणजे या जुगार अड्ड्यावर पन्नास पेक्षा अधिक जुगारी खेळत होते. या जुगाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवकाचा देखील समावेश होता. या नगरसेवकांपैकी एक जण हा जुगार अड्डा चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे. छापा टाकल्यावर सर्व 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने पोलिसांनी सगळ्यांची मुक्तता केली आहे. जुगार अड्डयावरु 50 लोकांना ताब्यात घेत पोलिसांनी यावेळी 2 लाख 2 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . सोशल रमीच्या नावावर तीरट नावाचा जुगार या जुगार अडड्यावर खेळला जात होता. काँग्रेसचा माजी नगरसेवक अफसर खान हा जुगार अड्डा चालवत होता. त्यामुळे अफसर खान यांच्यासह 57 जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.