जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
मुक्ताईनगर शहरातील जे. ई. स्कूलमध्ये सातवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा आज बुधवारी दि. ३० रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. चैतन्य शंकर मराठे (वय १२ रा. मुंढोळदे, ता. मुक्ताईनगर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चैतन्य मराठे नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेच्या बसने शाळेत आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत चैतन्यने जेवण केले आणि त्यानंतर तो मित्रांसोबत खेळत होता. त्यानंतर थोड्या वेळाने त्याने पाणी प्यायले आणि बाकावर बसल्यानंतर काही क्षणातच त्याची प्रकृती खालावली त्याला मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तात्काळ रुग्णालयात हळविले असता त्याला डॉक्टरांनी मृत – घोषित केले. चैतन्यच्या मृत्यूची बातमी कळताच शाळेत व त्याच्या गावात शोककळा पसरली. त्याचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. चैतन्यच्या मत्यचे कारण अद्याप समजलेले नाही.
