जळगाव मिरर | ३ मार्च २०२४
जुन्या वादातून दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी सोहम गोपाल ठाकरे (वय १८, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) या तरुणावर गोळीबार केल्याची घटना दि. २ मार्च रोजी घडली होती. गोळीबार केल्यानंतर तिघे संशयित पसार झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने शनिवारी सकाळी धुळे येथील देवपुर परिसरातील आत्याच्या घरी लपून बसलेल्या दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील मेहरुण परिसरातील लक्ष्मी नगरात सोहम ठाकरे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर देखील दिक्षांत हा सोहमला नेहमी खुन्नस देवून पाहत होता. शुक्रवार दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा त्याचे मित्र भैय्या राजपुत, ऋषीकेश वंजारी, सनी सोनवणे यांच्यासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका दुचाकीवर दिक्षांत सपकाळे, गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते. त्या दुचाकीस्वारांनी सोहमला शिवीगाळ केली, सोहमने त्यांना जाब विचारला असता, तु माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही, थांब तुझा मुडदा पाडतो असे म्हणत गोपालने त्याच्या कंबरेला खोचलेली पिस्तुल बाहेर काढत ती दिक्षांच्या हातात दिली. दिक्षांतने त्या पिस्तुलीतून सोहमवर गोळीबार करीत त्याला – जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हल्लखोर पसार झाल्याने दोन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केले होते. रात्रीपासून संशयितांचा शोध घेतला जात होता.
आत्याच्या घरी लपून बसलेल्यांना घेतले ताब्यात हल्लेखार संशयित दिक्षांत उर्फ दादू सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपुर येथे त्याच्या आत्याकडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक धुळे येथे रवाना केले. या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवित शनिवारी सकाळच्या सुमारास संशयित दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांना अटक केली त्यानंतर पथक जळगावकडे रवाना झाले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकों किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांच्या पथकाने केली.