जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२६
कामानिमित्त सर्व जण बा-हेर गेलेले असताना बंद घरात आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडे यासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली. या आगीत संपुर्ण संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिले आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे सुनील लहू सोनवणे (वय ४८) हे मजूरी काम करतात. कामानिमित्त ते व घरातील अन्य सदस्य बाहेर गेलेले असताना बंद असलेल्या घराला आग लागली. घरातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी घसमालकास माहिती दिली. आग वाढत जात असल्याने शेजारील मंडळीनीच पाणी मारून ती विझविली. मात्र या आगीत घरातील टीव्ही, सिलिंग व टेबल फॅन, पलंग, भांडे, कपडे यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्वकाही जळाले असून केवळ अंगावरील कपडे शिल्लक असल्याचे संसार उघडव्यावर आल्याचे घरमालक सुनील सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.



















