अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपतर्फे ग्रुपच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात बहुमान प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील श्री गायत्री माता मंदिरात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ग्रुपचे असंख्य महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.सुरवातीला श्री गायत्री मातेचे पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी नुकताच एमबीबीएस उत्तीर्ण झालेला डॉ.हिमांशू मनोहर महाजन,सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेली मनाली सुनिल छाजेड,12 वी कॉमर्स मध्ये उत्तर महाराष्ट्रात प्रथम आलेली कु कोमल प्रविण पारेख,नुकतीच इंजिनिअरिंग पदवी प्राप्त करणारी कु.नेहा सुनिल छाजेड,इंजिनिअरिंग पूर्ण करून एमबीए साठी प्रवेश मिळविणारा रोहित अविनाश अमृतकर,बीबीए उत्तीर्ण झालेला कृष्णा गिरीश वर्मा,एमबीबीएस ला प्रवेश मिळविणारा यश विरेंद्र वाधवाणी तसेच 10 वी आणि 12 वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी,आणि इतर क्षेत्रात गुणवत्ता मिळवलेले 20 ते 25 विद्यार्थी याशिवाय पुरस्कार प्राप्त माहिलांचा विशेष सत्कार ग्रुप सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पारस गोल्ड सराफी पेढीतर्फे गिफ्ट देण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केलीत.
दरम्यान निसर्गरम्यस्थळी झालेल्या या कार्यक्रमात अनेक महिला व पुरुष सदस्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.नितीन शाह यांच्या बासरीवादनाने विशेष रंगत आणली.मनोरंजनात्मक कार्यक्रमानंतर ग्रुपतर्फे सर्वाना स्नेहभोजन देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.सदर आयोजनासाठी श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर श्री गायत्री परिवार आणि माजी प्राचार्य डॉ.ए.जी. सराफ यांचे अनमोल सहकार्य लाभले.