जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात अप आणि डाऊन मार्गावर आसनगाव-आटगाव दरम्यान आरएच गर्डरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या उशिराने धावणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३-१४ जानेवारी मध्यरात्री ००:२५ वाजल्यापासून ते ०२:५५ वाजेपर्यंत असा ब्लॉक घेण्यात येणार आहे. क्र. १२१४१ लोकमान्य टिळक- पाटलीपुत्र एक्स्प्रेस ही १३ व १४ जानेवारीची गाडी २३:३५ ऐवजी ०३:३० वाजता सुटेल. क्र. ११०५७ मुंबई अमृतसर एक्स्प्रेस ही १३ व १४ रोजीची गाडी २३:३० ऐवजी ०३:४० वाजता सुटेल. क्र. १२८११ लोकमान्य टिळक हटिया एक्स्प्रेस ही १४ व १५ जानेवारी रोजी सुटणारी गाडी ००:१५ ऐवजी ०४:०० वाजता सुटेल. क्र. २२१७७ मुंबई-वाराणसी एक्स्प्रेस ही १४ व १५ रोजीची गाडी ००:१० ऐवजी ०४:२० वाजता सुटेल. क्र. २२५३८ लोकमान्य टिळक- गोरखपूर एक्स्प्रेस ही दि. १४ व १५ रोजीची गाडी ००:३५ ऐवजी ०४:३० वाजता सुटेल.