जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
राज्यातील चर्चित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरोडे यांच्या हळदीचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर काही दिवसांतच घनश्यामने हळद लावलेला व्हिडिओ टाकताच नेटिझन्समध्ये चर्चा रंगली—“छोटा पुढारी लग्न करतोय का?”, “वहिनी कोण?” अशा कमेंटचा पाऊस पडला.
घनश्यामला अनेकांनी फोन करून विचारपूसही केली. अखेर स्वतः घनश्याम दरोडे यांनी व्हिडिओद्वारे या अफवांवर शिक्कामोर्तब उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “हा व्हिडिओ माझ्या लग्नाचा नसून एका प्रमोशनचा भाग होता.” घनश्यामने म्हटले, “मी अजून सेटल व्हायचं आहे. चांगल्या स्वभावाची, कुटुंब सांभाळणारी मुलगी शोधत आहे. अजून ती मुलगी सापड लेली नाही. माझं अजून लग्न जमलेलं नाही, पण काळजी करू नका—लवकरच तुमच्यासाठी वहिनी आणू.” त्यांनी पुढे चाहत्यांना विनंती केली की, “अफवा पसरवू नका. मला सतत फोन येत आहेत, त्रास होतो आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा फक्त प्रमोशनचा होता. माझं लग्न वगैरे ठरलेलं नाही.” घनश्यामने विनोदात असेही म्हटले की, “तुमच्या ओळखीमध्ये योग्य मुलगी असेल तर कळवा, काही हरकत नाही.” शेवटी चाहत्यांचे आभार मानत ते म्हणाले, “लवकरच बोहोल्यावर चढू बरं का… योग्य वेळ आली की लग्न नक्की करीन.”
कोण आहे घनश्याम दरोडे?
घनश्याम दरोडेचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे बालपण ग्रामीण भागात गरिबीत गेले. उंचीने लहान असला तरी त्याचा आत्मविश्वास अत्यंत मोठा आहे. त्यामुळेच समाजात त्यांना “छोटा पुढारी” हे विशेष नाव मिळालं. घनश्याम दरवडे हा ‘बिग बॉस मराठी सीझन 5’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार यासारख्या विषयांवर घनश्याम दरोडेची मते स्पष्ट आणि ठाम असतात.




















