जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
राज्यातील आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिंदे गटातील आमदाराने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आ.संजय शिरसाठ म्हणाले कि, उद्धव ठाकरेंनी काल आपण हरणार आहोत हे मान्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, जर आम्ही 16 पात्र झालो तर त्यांचे उरलेले आमदार अपात्र ठरतील ह्या भितीने त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली असा हल्लाबोल देखील केला आहे. आजचा जो निकाल लागणार आहे तो महाराष्ट्रापुरता सिमित नाही, याचे पडसाद देशातील प्रत्येक राज्यात दिसून येणार आहे असे म्हणतानाच आज आमचा विजय होईल असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाचा मूळ स्वभाव हा आरोप करणे झाला आहे. त्यांनी कोणत्या विषयावर आरोप केले नाही. त्यांनी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले आहे. त्यांनी आरोप करुण काही होत नाही. त्यांनी केलेल्या चुकांमुळे निकाल आमच्या बाजूने लागणार अशी आम्हाला खात्री आहे. निकाला देताना तो कायद्याच्या चौकटीत राहून द्यावा लागणार आहे, त्यामुळे कुणी कोणाला भेटले म्हणून निकाल बदलत नसतो. मला काय वाटते मला काय आवडते यापेक्षा कायदा काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.