जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त पारोळा येथे येत असताना मागाहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेल्या ७५ वर्षीय कमलबाई नारायण माळी या महिलेचा मृत्यू झाल्याचे घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथून ११ रोजी दुफारी अडीच वाजेच्या सुमारास पृथ्वीराज धनराज माळी हे आपली आजी कमलबाई नारायण माळी (वय ७५, दोघे रा. बाभळेनाग) हे दुचाकी (एमएच १९, डीके ८४०२) ने पारोळा येथे नातेवाईकांकडे लग्नापूर्वी असलेल्या हळदीचा कार्यक्रमासाठी येत होते. या वेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हिरापूर फाट्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव कार (एमएच- २०, बीटी- ८३९२) ने त्यांच्या दुचाकील जबर धडक दिली. या अपघातात पृथ्वीराज माळी व कमलबाई माळी हे दोघे खाली पडले. या दुर्दैवी अपघातात कमलबाई माळी यांचा मृत्यू झाला तर पृथ्वीराज माळी हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत कार चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.