जळगाव मिरर / १६ जानेवारी २०२३
गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता, तो गंभीररित्या जखमी झाल्यानंतर आता उत्तम असल्याचे वृत्त आहे. त्याने अपघातानंतर पहिल्यांदा ट्विट केल्याने क्रिकेटप्रेमींची अपेक्षा वाढल्या आहेत.
यामध्ये त्याने त्याच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, मैदानातील परतीचा प्रवास सुरू झाला असून, पुढील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे पंतने ट्वीटमध्ये म्हटले आहे. अपघातानंतर मदत केल्याबद्दल पंतने बीसीसीआय आणि जय शहा यांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत. 30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना ऋषभ पंतच्या कारला रुरकीजवळ दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला होता. या धडकेनंतर पंतच्या कारने पेट घेतला होता. वेळीच सावध होत पंत गाडीतून बाहेर पडला. त्यामुळे पुढील मोठा धोका टळला.
From the bottom of my heart, I also would like to thank all my fans, teammates, doctors and the physios for your kind words and encouragement. Looking forward to see you all on the field. #grateful #blessed
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक
बीसीसीआय आणि जय शाहांसोबतच पंतने सर्व चाहते, डॉक्टर आणि फिजिओ यांचेदेखील मनापासून आभार मानले आहेत. तसेच तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
