जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 9.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11.05 वाजता मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती. सकाळी 11.10 वाजता जळगाव विमानतळ येथुन मोटारीने मा.पंतप्रधान महोदयांसमवेत प्राईम इंडस्ट्रियल पार्ककडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत “ लखपती दीदी सम्मेलन ” क्षमता बांधणी मेळावा. (स्थळ : प्राईम इंडस्ट्रियल पार्क, जळगाव विमानतळाजवळ, राष्ट्रीय महामार्ग 753 एफ, जळगाव).
दुपारी 1.00 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती. दुपारी 1.20 वाजता जळगाव विमानतळ येथुन शासीकय विमानाने मुंबईकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण. सायं 2.50 वाजता सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई आगमन व राखीव.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवार 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो खालील प्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे सकाळी मुख्यमंत्री यांच्या समवेत 8.40 वाजता आगमन, विमानाने जळगावकडे प्रयाण, 9.45 जळगाव विमानतळ, जि. जळगाव येथे आगमन व राखीव,
सकाळी 11.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती, 11.10 ला मोटारीने प्रयाण प्राईम इंडस्ट्रियल पार्क, जळगांव येथे आगमन, 11.15 ला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “लखपती दिदी – कार्यक्रमाला उपस्थित, कार्यक्रमानंतर दुपारी दुपारी 1.05 वाजता मोटारीने प्रयाण जळगांव विमानतळ, जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती, जळगाव विमानतळ येथून मुख्यमंत्री यांच्या समवेत दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण, दुपारी 2.20 ला विमानाने, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे आगमन, सहयाद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई कडे प्रयाण.