जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।
महाराष्ट्र चेंबर व उद्योग विभाग पुरस्कृत राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाचा शुभारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात झाला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकार सकारात्मक असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देईल. यशस्वी महिला उद्योजकांचे उदाहरण देऊन महिला उत्कृष्ट नियोजन करून व्यापार उद्योग करत असल्याचे सांगितले. राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानातून राज्यातील महिलांना व्यापार उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळेल. सरकारी योजना व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मार्गदर्शन मिळेल. महिला सक्षम होतील असा विश्वास व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. संगीता पाटील उपस्थित होते.
सुरवातीला राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. संगीता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाची माहिती विशद केली व महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता विकास समितीच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योग विभाग पुरस्कृत राज्यात महिला उद्योजकता अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच राज्याच्या विकासाचा रोड मॅप तयार करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र चेंबरला सांगितले त्याप्रमाणे 36 जिल्ह्यात डिस्टिक डेव्हलपमेंट फोरम व जिल्हा कार्यालय स्थापन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली तसेच मुंबई येथे मायटेक्स प्रदर्शन होत असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे व या प्रदर्शनात देशातील इतर राज्यतील व प्रदेशातील 500 व्यापारी उद्योजक सहभागी झाले आहेत सर्वांनी या प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन केले.
भुसावळचे आमदार संजय सावकारे व जळगावचे आमदार राजू मामा मुळे यांनीही मार्गदर्शन केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानास शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टार्टअप व इनोव्हेशन या विषयावर सौ प्रीती अग्रवाल व श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले. याप्रसंगी भारती काळे, मुनीरा तरवारी, महेंद्र रायसोनी, नितीन रेदासनी, नंदू अडवाणी, श्याम अग्रवाल, रमण जाजू, चंद्रकांत सतरा, सुनील महाजन, संदीप भोळे, शैलेश काबरा, संजय जैन, संदीप भोळे, परिमल मेहता, विनोद बियाणी, जितेंद्र जैन, सचिन चोरडिया, दिलीप गांधी, दर्शन टाटीया, रामेश्वर मंत्री, अनिल कांकरिया, सुयोग जैन सुनील सुखवाणी, निलेश कोटेचा, गौरव सपळे, निलेश अग्रवाल, योगेश भोळे, रुपेश शिंदे, राकेश कंडारे आदींसह महिला व महाविद्यालयात विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाचा उद्देशसौ. संगीता पाटील यांनी महिला उद्योजकता विकास अभियानाचा उद्देश सांगितला. राज्यातील महिलांना उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे, उद्योग करण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती व मार्गदर्शन देणे, बँकांच्या योजनांची माहिती देणे, या अभियानाद्वारे राज्यात जास्तीत जास्त महिला उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला उद्योजकता विकास समितीच्या चेअर पर्सन सौ. संगीता पाटील यांनी दिली.
