जळगाव मिरर | २ जुलै २०२४
स्मार्ट मीटर विरोधात एम. एस. ई. डी. सी. एल. मीटर रीडर संघटनेतर्फे आज सावदा डी व्हिजन चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात.
महाराष्ट्रभर स्मार्ट मीटर लावण्यात येणार असल्याच्या विरोधात आज सावदा डी व्हिजन चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ सपकाळे यांना सावदा संघटनेच्या पदधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर मूळे सध्या रीडिंग घेणाऱ्या कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून काम करणाऱ्या रीडर यांना पर्यायी साठ वर्षापर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे सावदा डी व्हिजन चे अध्यक्ष इसरार शेख, नरेंद्र मेढे, नईम शेख, मुकेश तायडे, युसुफ खाटीक, महेंद्र पांडव, अमोल सावळे, मुस्तकिम शेख, शेख इसाक, हमीद तडवी, रिसलवत तडवी, नोमिन शेख, आमिन तडवी, हुसेन तडवी, समीर शेख, आमिर खान, अमर शिरतुरे, शेख अहेसान उपस्थित होते.