
जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे मानव तस्करीविरोधी जागतिक दिनानिमित्त हिंगोणे गावात जन-साहस फाउंडेशन, DMRC-MRC आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामस्थांमध्ये मानव तस्करीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याचा संदेश देणे हा होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा समन्वयक श्री. निलेश शिंदे सर यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधत, मजुर आणि त्यांच्या कुटुंबियांना तस्करीचे विविध प्रकार – जसे की बालमजुरी, जबरदस्तीचे काम, लैंगिक शोषण, बंधनकारक मजुरी – याविषयी माहिती दिली.
“तुम्ही केवळ मजूर नाही, तर जागरूक नागरिक आहात. हक्कांची जाणीव ठेवा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा. संकट आल्यास मदतीसाठी त्वरित पुढे या.”
कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम:
-
जनजागृती फेरी: “मानव तस्करी बंद करा”, “बालकांचे हक्क सुरक्षित ठेवा” अशा घोषणांनी गावात जनजागृती रॅली काढण्यात आली.
-
माहिती सत्र: तस्करीची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कायदेशीर हक्क व मदतीसाठी उपलब्ध मार्ग यावर मार्गदर्शन.
-
शपथविधी: ग्रामस्थांनी मानव तस्करीविरोधात सजग राहण्याची शपथ घेतली.
-
हेल्पलाइन माहिती वाटप: आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक हेल्पलाइन क्रमांकांचे पत्रक गावकऱ्यांमध्ये वितरित.
महत्वाचे हेल्पलाइन क्रमांक:
-
☎️ 1800 2000 211 – जन-साहस फाउंडेशन
-
☎️ 181 – महिला मदत केंद्र
-
☎️ 1098 – चाईल्ड हेल्पलाइन
-
☎️ 112 – आपत्कालीन सेवा
कार्यक्रमाचे संयोजन FO हितेंद्र माळी, JS श्रीनाथजी आणि JS प्रियांका गायकवाड यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये तस्करीविरोधात सजगतेची नवी जाणीव निर्माण झाली.




















