अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या १८ दिवसापासून कोळी समाजबांधव आपल्या विविध मागण्यासाठी उपोषण सुरु असतांना जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे तर अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात विविध मागण्यांसाठी कोळी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजापर्यंत तर धुळे रोड, कचेरी रोडपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
टोकरे कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. तरीही शासन उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून त्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी शासनातर्फे सुनील नंदवाळकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
कोळी समाजाचे भूषण कोळी मनोज कोळी, जितेंद्र कोळी, गोपाल देवराज, राहुल येवडे, सतीश कोळी, समाधान कोळी, महेंद्र कोळी, सुनील कोळी, हर्षल कोळी, बापू कोळी, ताराचंद कोळी, ओम कोळी, हिरालाल कोळी, सुखदेव कोळी, महेंद्र कोळी अक्षय कोळी, सुभाष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नामदेव कोळी, भूषण कोळी, राहुल कोळी, अजय कोळी, प्रवीण कोळी, विजय कोळी, किरण गंगाराम कोळी, भरत मोरे आदी उपस्थित होते. रास्ता रोकोवेळी सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोडे, कर्मचारी दिपक माळी, रवि पाटील, संजय पाटील, श्रीराम पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली.