जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२५
नशिराबादकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचे टायर फुटले. त्यामुळे ती चारचाकी उलटून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेलरच्या डिझेल टॅकवर आदळली. या विचित्र अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून यामध्ये यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी, ता. धरणगाव) व पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरुण) हे दोघ गंभीर जखमी झाले, ही घटना रविवार दि. ७ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बायपासरील आव्हाणे शिवारात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहराबाहेरुन गेलेल्या बायपासवरुन अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास बायपासवर तरसोद फाट्याकडून (एमएच १९, ईजी १८७८) क्रमांकाचे वाहन पाळधीकडे जात होते. यावेळी रस्त्याने जात असलेल्या चारचाकी वाहनाचे अचानक टायर फुटून वाहन उलटले. दोन वेळा उलटल्यानंतर ते चारचाकी वाहन थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या (सीजे ०७, बीआर ३७१७) क्रमांकाच्या ट्रेलरच्या डिझेल आहे. टॅकवर धडकले.
या विचित्र अपघातात चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी, ता. धरणगाव) व पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरुण) हे दोघे जण जखमी झाले. दोघांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली असून तरुणाच्या पायालाही मार लागला. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रेलर चालकाची चौकशी करीत अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.




















