सोशल मिडीयावर नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात अनेक तरुण तरुणी रेल्वेत देखील व्हिडीओ शूट करीत असतात, पण काही चांगले संदेश देणारे असतात तर काही किळसवाणे असतात असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप काही थांबायचे नाव घेत नाहीत. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने सगळीच हद्द पार केल्याचे पाहायला मिळत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीची मेट्रो प्रवासाच्या सुख सुविधांपेक्षा त्यात चित्रित होणाऱ्या व्हिडिओमुळेच नेहमी चर्चेत असते. कधी कपलच्या रोमान्समुळे, कधी प्रवाशांच्या फायटिंगमुळे तर कधी रिल्सस्टारच्या डान्समुळे दिल्ली मेट्रो चर्चेत येत असते. मेट्रो प्रशासनाने असे व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाईही केली, मात्र दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले असून आता तर एका जोडप्याने हद्दच केली.
https://twitter.com/ShashikantY10/status/1711688980616675372?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1711688980616675372%7Ctwgr%5E972a17336928c3cf6651c76231f77eb1a16c7093%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fviral-videos%2Fcouple-spitting-drink-in-each-other-mouth-shameful-act-in-a-delhi-metro-front-of-passenger-video-viral-gp98
सध्या दिल्ली मेट्रोमधील एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांनी असा किळसवाणी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा द्या.. अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल चक्क एकमेकांच्या तोंडात चुळ मारुन कोल्ड्रिंक्सचा आस्वाद घेताना दिसत आहे.वाचूनच अगदी किळसवाणा वाटला ना? पण दिल्ली मेट्रोत हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल हातात कोल्ड्रिंगची बॉटल घेवून रिल शूट करत आहेत. हा तरुण पहिल्यांदा या मुलीला कोल्ड्रिंग्स पाजतो. ज्यानंतर ती मुलगी तेच कोल्ड्रिंग त्याच्या सोंडात सोडताना दिसत आहे. २-३ वेळा या दोघांनी केलेली ही किळसवाणी कृती पाहून प्रवाशांनी अक्षरशः डोळेच मिटले.