जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर आपल्या कौशल्याचे दाणादाणे दाखवले आहे. अथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) मार्फत घेण्यात येणाऱ्या सब-जुनिअर राज्य निवड चाचणी स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर प्रवेश मिळवला आहे.
भुसावळ येथे झालेल्या जिल्हा स्तरावरील निवड चाचणीत चांदसरकर विद्यालयाच्या चैताली नितीन सोनवणे या बारा वर्षे वयोगटातील विद्यार्थिनीने लांब उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्यस्तरावर निवड झाली. तसेच, देवयानी योगेश वाघ या दहा वर्षे वयोगटातील विद्यार्थिनीने स्टॅंडिंग जंप प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला आणि तिचीही राज्यस्तरावर निवड झाली.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक महेश तायडे आणि मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांचा कठोर मार्गदर्शन व दोन वर्षांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. सर्व शिक्षकवृंदांच्या परिश्रमाचे हे फळ असून विद्यार्थ्यांचे कष्ट आणि मेहनत राज्यस्तरावर मान्यता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे आदरणीय भिरुड सर आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी चांदसरकर यांनी कौतुक केले आणि त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे चांदसरकर प्राथमिक विद्यालयाचा नाव राज्यस्तरावर चमकले असून, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे आणि मेहनतीचे सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.





















