
विज्ञान प्रदर्शन, बाल आनंद मेळाव्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६
पिंप्राळा येथील युटोपीया इंग्लिश मीडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून चिमुकल्यांच्या कलागुनांना भरभरून प्रतिसाद दिला.
युटोपीया इंग्लिश मीडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दि.३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन व बालआनंद मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या ७५ विद्यार्थ्यांनी अतिषय उत्तम पध्दतीने मॉडेल तयार करून सादर केले. तसेच बालआनंद मेळाव्यात १० विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरेदी विक्रीचे व्यावहारीक ज्ञान अवगत केले. त्यानंतर दि.१ फेब्रुवारी रोजी शाळेच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र पाटील, कविता शिवदे, माधुरी बारी, अतुल बारी, आयडीयल इंग्लिश स्कुलचे प्राचार्य श्रीकांत निकम उपस्थित होते. तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमाकांत बुंदेले यांनी भूषवले. स्नेहसंमेलन कार्याक्रमात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून हिंदी-मराठी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेवर नाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले तर, आभार शाळेच्या प्राचार्या अपर्णा बुंदेले यांनी मानले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक कल्याणी बुंदेले, अपेक्षा सरदर, ज्योती दांडगे, मोहिनी चौधरी, प्रियंका पाटील, धनश्री चौधरी, रेखा सुरवाडे, ममता पाटील, अमेय बुंदेले, चंद्रकांत बुंदेले यांनी परिश्रम घेतले.





















