
जळगाव मिरर | १७ जून २०२५
दिनांक 16/6/2025 सोमवार रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री गणेश सोनवणे तर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी श्रीराम विद्यालयाचे सचिव व माजी नगरसेवक श्री अशोक भाऊ लाडवंजारी, श्री राजू मोरे (माजी नगरसेवक), श्री सुनील भाऊ माळी (माजी नगरसेवक), श्री रहीम तडवी (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार गट), श्री भाऊसाहेब इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार गट ), श्री किरण राजपूत ( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संचालक श्री वासुदेव भाऊ सानप, श्री राहुल लष्करे, संतोष चाटे, श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या संचालिका संध्या ताई वंजारी, पालकांमधून अरिफा बी या व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी सरस्वती मातेच्या पूजनाने केली, यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप इयत्ता 5 ते 8 वीचा विद्यार्थ्यांना करण्यात आले.
दैनिक सकाळ या वर्तमान पत्राचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध उपक्रम माहिती मिळावी यासाठी तसेच विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाची गोडी वाढावी यासाठी दैनिक सकाळ कार्यालयाकडून दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले*दैनिक सकाळ या वर्तमानपत्राच्या या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे सचिव व प्रमुख अतिथी श्री अशोक भाऊ लाडवंजारी यांनी दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे कौतुक केले, व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर यांनी मागील शैक्षणिक वर्षात विद्यालयाचा शैक्षणिक ,क्रीडा प्रगतीचा आढावा सांगितला व वाचनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल व प्रगती विषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अतुल चाटे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले