जळगाव मिरर । १३ नोव्हेंबर २०२५
जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (वय ५७, रा. जामनेर) यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. परंतू सर्व विधी पार पडल्यानंतर चौकशीला येवू अशी भूमीका त्यांनी मांडल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली. मात्र पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे, कावडीया यांच्या मोबाईल हाती लागल्यानंतर अनेक खुलासे देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बनावट कागदपत्रे वापरून शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (वय ५७, रा. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संस्थाध्यक्ष राजकुमार कावडिया यांचा दि १० नोव्हेंबर जळगावात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेशी संबंधित असलेल्यांची चौकशी करुन त्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे.
कावडीया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सुसाईट नोट, व्हिडिओ विषयी अनेक चर्चा सुरु होतया. या चर्चा पाहता पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जात आहे. करीता कावडिया कुटुंबीयांचे जाबजबाब होणे महत्वाचे आहे. पोलिसांनी बुधवारी त्यांचा जबाब घेण्यासाठी बोलाविले होते. परंतू त्यांनी सध्या सर्व विधी बाकी असल्याने ते पूर्ण झाल्यानंतरच जबाब देऊ, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.




















