जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४
माजी महसुल मंत्री विधानपरिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रावेर तालुक्यातील एनपूर, वाघोदा खु, वाघोदा बु, मांगलवाडी, खिर्डी खु, खिर्डी बु, पुरी, बलवाडी ,उदळी बु येथे विकास कामांचे माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी जेष्ठ नेते रविंद्र भैय्या पाटिल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,माजी सभापती निवृत्ती पाटिल, तालुका अध्यक्ष किशोर पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले
यामध्ये एनपूर, खिर्डी खु, पुरी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे,वाघोदा खु ,वाघोदा बु खिर्डी खु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे, र खिर्डी बु , बलवाडी,मांगलवाडी, येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, तर उदळी बु येथे आ एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या एक कोटी तेरा लक्ष रुपये सि एस आर निधी अंतर्गत सभागृह बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या तुम्हा सर्वांच्या साथ आशिर्वादाने आ एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले या काळात त्यांनी जातपात, पक्षिय मतभेद न करता मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत गावातील अंतर्गत रस्ते, गटार, सभागृह , इत्यादी मुलभूत सुविधा आणि गाव जोडणारे रस्ते आणि इतर विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मिळाला आपला परिसर हा केळी उत्पादक भाग आहे आ.एकनाथराव खडसे कृषी मंत्री असताना त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचा लाभ मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले त्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना करपा निर्मुलन पॅकेज दिले होते परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे मंजुर होऊन सुद्धा केळी पिक विमा मिळत नाही सि एम व्ही रोग आल्यावर त्याच्या निर्मूलनासाठी शासन स्तरावरून कोणतेही प्रयत्न झाले नाही म्हणून
आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आणखी राहिलेले विकास कामे करण्यासाठी सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची रोहिणी खडसे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटिल यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्रातील राज्यातील सत्ताधारी हे शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले असुन भविष्यात या घटकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा मुक्ताईनगर मतदारसंघावर फडकविण्यासाठी साथ द्यावी असे आपल्या मनोगतात रविंद्रभैय्या पाटिल म्हणाले
यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे म्हणाले तिस वर्षाच्या कालखंडात मुलभूत सुविधा, रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण यासाठी निधी आणुन मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला कामे करत असताना कोणतेही मतभेद, अभिनवेश न बाळगता विकासाला प्राधान्य दिले म्हणूनच आपण तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हा विकासरथ अव्यहातपणे असाच सुरू राहील केळी, कापुस उत्पादकांचे प्रश्न असो तापी काठावरील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न असो कि इतर प्रश्न असो विधिमंडळात मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्ही अनमोल साथ दिली भविष्यात सुद्धा हि साथ कायम ठेवा राज्यातील सत्ताधारी हे विविध योजनांची प्रलोभने दाखवत आहेत परंतु आतापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले त्यांना या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे आ एकनाथराव खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.
याप्रसंगी माजी प स सदस्य दिपक पाटिल, योगिता वानखेडे, सचिन महाले, सुनिल कोंडे, नितीन पाटिल,शशांक पाटिल, अमोल महाजन, किशोर महाजन, काशिनाथ महाजन,किरण नेमाडे,भागवत कोळी, श्रीकांत चौधरी,गणेश देवगिरीकर,रोहन च-हाटे,सलमान खान, हैदर खान, अरविंद महाजन, मोहन कचरे,पवन चौधरी,शुभम मु-हेकर,शांताराम पाटिल,सुशिल पाटिल,ललित पाटिल,अश्विनी ताई बा-हे,लोटू पाटिल, राजेंद्र चौधरी,मधुकर पाटिल,सुनिल पाटिल,उज्वल पाटिल,सुधिर पाटिल सुनिल कोल्हे, निळकंठ बढे,मनोज भंगाळे, उल्हास भंगाळे,संतोष महाजन, अय्यास शे गयास, गजानन कांडेले,मालतीबाई तायडे, दिपक तायडे,विजय तायडे, सतिष पाटिल, प्रदिप पाटिल, अजय पाटिल,हरी पाटिल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते