जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या व चाहत्यांच्या मनावर राज्य कमी वेळेत साध्या करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत ठरला होता. पण बॉलिवूडमध्ये खूप कमी काळात त्याने स्वप्न भंगले पण सुशांतला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला तीन वर्ष उलटली आहेत. तरी देखील चाहत्यांच्या मनात सुशांतबद्दल असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. आज देखील चाहते सुशांत सिंह राजपूत याच्या जुन्या आठवणी ताज्या करत असतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांना अभिनेत्याची आठवण येत असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून त्या व्हिडीओचा संबंध सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.