
जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५
शहरातील आकाशवाणी चौक येथे दि.१७ ऑगस्ट रोजी एका राजकीय पक्षाचे भले मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबतचे ‘जळगाव मिरर’ने वृत्त प्रकाशीत केले होते त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने दि.१९ रोजी यावर कारवाई करत सदरील व्यक्तीला दंड दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.१७ रोजी शहरातील आकाशवाणी चौकात एका राजकीय नेत्यांच्या स्वागताचे भले मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. मनपाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून हे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबत ‘जळगाव मिरर’ने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर दि.१९ रोजी मनपाने या होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तीला ९ हजार नऊशे बारा रुपयांचा दंड देण्यात आला आहे तर ‘नही’च्या कार्यालयाला देखील नोटीस पाठविण्यात आल्याचे समजते.
मनपाच्या नाकावर टिच्चून आकाशवाणी चौकात लागतेय भले मोठे होर्डिंग !




















