जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
शहरात गेल्या दोन दिवसापासून वारा, वादळासह पाऊस सुरु असून शहरातील आकाशवाणी चौक येथे गेल्या तीन दिवसापासून भले मोठे होर्डिंग लावण्याचे काम सुरु आहे. या होर्डिंगचे काम गेल्या तीन दिवसापासून सुरु आहे. तरी देखील मनपाला इतके मोठे होर्डिंग लागत असल्याची कुणकुण देखील आली नाही का ? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. कि, मुद्दामहून मनपाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. या भल्या मोठ्या होर्डिंगवर मनपा कारवाई करणार कि नाही.
शहरातील आकाशवाणी चौकात नेहमीच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतातच हे काही नवीन नाही मात्र सध्या पावसाचे दिवस सुरु आहे. जोरदार वारा, वादळ व पाऊस आल्यास हे होर्डिंग कोसळले तर मोठी दुर्घटना घडू शकते, याचा देखील मनपा प्रशासनाने विचार करायला हवा. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचा जीव धोक्यात येवू शकतो. आकाशवाणी चौकात इतके मोठे होर्डिंग लावण्याची मनपा प्रशासनाने परवानगी दिली का ? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जर मनपाने या होर्डिंग लावण्याची परवानगी दिली असले तर मनपाचा वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकत आहे का ? जर हि परवानगी दिली असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकारयांवर कारवाई होणार का ? जळगाव मनपा प्रशासनावर कुठला दबाव आहे का ? असा देखील प्रश्न चर्चेत येत आहे.
सुट्टीच्या दिवशी मनपाला आली जाग !
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे मोठे होर्डिंग गेल्या तीन दिवसापासून काम सुरु आहे मात्र आज दि.१६ ऑगस्ट रोजी मनपाच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केला असता. त्यांनी सांगितले कि, या होर्डिंगची नोटीस बनवून ठेवली आहे, मात्र दोन दिवस सुट्टी आल्याने सोमवारी नोटीसवर स्वाक्षरी होवून नोटीस देण्यात येणार आहे. जर सोमवारी नोटीस देणार असाल तो पर्यत त्या होर्डिंगचे काम झाल्यावर होर्डिंग काढण्यात येणार मग मनपा नोटीस देणार कुणाला ?
‘याच’ रस्त्याने बड्या अधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा !
शहरातील आकाशवाणी चौकातून दिवसभरातून दोन ते तीन वेळेस जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची ये-जा सुरु असते. तरी देखील हे भले मोठे होर्डिंग कुणाला दिसले नसेल का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.




















