जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२५
यावल-चोपडा महामार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासारखेडा येथील रसूल रहिमान तडवी, आलिशान रहिमान तडवी आणि सलीमा रहीम तडवी हे तिघे दुचाकी (क्र. एमएच १९ डीवाय ९०४७) वरून यावलहून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, फॉरेस्ट नाक्याजवळ समोरून आलेल्या चारचाकी कारने (एमपी ०९ डब्ल्यूएल ३९१५) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आलिशान रहिमान तडवी (महिला) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रसूल तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संबंधित चारचाकी वाहन जप्त केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.



















