जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सुलतानपूर लगत अपघात झाला आहे. त्यात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील एका भाविक महिलेचा बळी गेला आहे. या घटनेत 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. छोटीबाई पाटील (55) असे मृत महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द येथील 30 महिला व 5 पुरुषांचा एक समूह अयोध्येतील प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेला होता. सर्वजण जळगावहून रेल्वेने वाराणसीला पोहोचले होते. त्यानंतर तेथून ते प्रयागराज येथे जात असताना सुलतानपूर येथे त्यांचा अपघात झाला. जळगावचे जिल्हाधिकारी व शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ प्रयागराजच्या प्रशासनाशी संपर्क साधला. सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकरच रेल्वेने जळगावात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.




















