जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६
ठेकेदारासह स्वतःच्या बँक खात्यातून काढलेली दहा लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून जात असतांना सुपरवायझरची दुचाकी अचानक पंक्चर झाली. पंवर जोडण्याकरीता ते जूने बस स्थानकासमोरील गल्लीत गेले असता, संधी साधत चोरट्यांनी डिक्कीतून ८ लाखांची रोकड लांबवली. तर शंभरचे बंडल असलेले दोन लाख तेथेच सोडून चोरटे पसार झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चार चोरटे दोन दुचाकीवरून जाताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहाडी रोड परिसरातील रहिवासी असलेले मयूर रविंद्र चौधरी हे ठेकेदार असून त्यांच्याकडे प्रेम महारु जाधव (रा. रामेश्वर कॉलनी) हे सुपरवायझर आहेत. मक्तेदार चौधरी यांना मजुरांना पैसै द्यायचे असल्याने त्यांनी त्यांच्या सुपरवायझरला बँकेतून पैसे काढण्यासाठी पाठविले होते. सुपरवायझरने मक्तेदाराच्या खात्यातून पाच लाख व स्वतःच्या नावे असलेल्या खात्यातून पाच लाख असे एकूण १० लाख रुपये काढले. ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून मोहाडी रस्त्यावर कार्यालयात जात असताना काही अंतरावरच त्यांची दुचाकी पंक्चर झाली. आजूबाजूला कुठेही पंक्चरचे दुकान नसल्याने प्रेम जाधव हे जुने बसस्थानकासमोर असलेल्या नवीपेठेतील गल्लीत असलेलया पंक्चरच्या दुकानावर गेले आणि तेथे पंवर काढण्याकरीता दुचाकी लावली.
दुचाकी लावल्यानंतर प्रेम जाधव हे समोरच असलेल्या नाश्त्याच्या दुकानावर नाश्ता घेण्याकरीता गेले. ही संधी साधताच मागावर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण त्यांच्या दुचाकीजवळ आला आणि डिक्कीतून आठ लाख रुपये काढून पसार झाला. नाश्ता घेऊन प्रेम जाधव हे दुचाकीजवळ आले असता, त्यांना डिक्कीत ठेवलेली रोकड लंपास झाल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच
संशयित चोरटे हे प्रेम जाधव यांचा महापालिके समोरील बँकेपासून रेकी करीत पाठलाग करीत होते. त्यांनी रोकड चोरण्याकरीता प्रेम जाधव यांची दुचाकी पंवर केल्याचा शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तसेच मागावर असलेल्या चोरट्यांना संधी मिळताच त्यांनी रोकडवर डल्ला मारुन पसार झाले. तसेच हे चोरटे परप्रांतीय असल्याचा जाधव यांनी ठेकेदार रविंद्र चौधरी यांना घटनेची माहिती दिली. त्या वेळी सर्व जण घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती पोलिसांना दिली.




















