जळगाव मिरर | २ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वच पक्षांचा जोरदार सुरु असतांना आरोप प्रत्यारोप देखील सत्ताधारी व विरोधकामध्ये होत असतांना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील दुजोरा दिला आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना देखील मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्पोट संजय शिरसाट यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील फोन केले होते, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती, असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता संजय शिरसाट यांनी देखील मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या काळात मुख्यमंत्री पदाची ऑफर एकनाथ शिंदे यांना देखील दिली होती, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी संजय शिरसाठ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.