
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४
बाळाने जन्म घेणे ही सुखद घटना आहे. अशीच सुखद घटना एलटीटी ते प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये घडली. ट्रेनमधील बी १२ या कोचमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना झाल्याचे कळताच ट्रेनमध्ये कार्यरत असणाऱ्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सह महिला प्रवाशांच्या सहकार्याने गर्भवती महिलेला सुरक्षितपणे प्रसूती करण्यात मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एलटीटी ते प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेस मंगळवार, २ एप्रिल रोजी प्रयागराजच्या दिशेने जात असताना बी १२ या कोचमध्ये एका महिलेला प्रसूती कळा येत असल्याची माहिती तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना मिळाली. घटनास्थळी धावत घेत कर्मचाऱ्यांनी सह महिला प्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर तत्काळ व्यावसायिक नियंत्रणास सूचित केले आणि ट्रेनला बुऱ्हानपूर येथे आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आई आणि नवजात अर्भकाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिके द्वारे रुग्णालयात नेण्यात आले. बुऱ्हानपूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये आई आणि नवजात बाळ दोघेही निरोगी आहेत. हे कुटुंब प्रयागराज येथे आपल्या मूळ गावी जात होते. या कार्यात नंद बिहारी मीणा, आलोक शर्मा, राजकरण यादव आणि इंद्र कुमार मीणा यांच्यासह सर्व तपास कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले