मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील एका शहरात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने प्रंचड खळबळ निर्माण झाली होती. या महिला अहमदनगर येथील रहिवासी असून त्या सध्या मुंबईच्या कुर्ला ईस्टमधील नेहरू नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शीतल एडके (35, मुळ रा. अहमदनगर) असे त्यांचे नाव आहे. त्या मुंबईच्या कुर्ला ईस्टमधील नेहरू नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. कामगार नगरमधील शरद सोसायटीमध्ये त्या रहावयास होत्या.
गेल्या दीड वर्षापासुन पोलिस उपनिरीक्षक शीतल एडके या आजारी होत्या. कामगार नगरमधील शरद सोसायटीमध्ये त्या भाडयाच्या घरात राहत होत्या. त्या अविवाहीत होत्या. शरद सोसायटीच्या 5 व्या मजल्यावर त्यांच्या राहत्या घरातून प्रचंड वास येत असल्याची माहिती शेजार्यांनी स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. शीतल एडके यांचा मृत्यू सुमारे 3 ते 4 दिवसांपुर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत झोन-6 चे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी माहिती दिली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षकाचा राहत्या घरातच मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.