जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
देशात गेल्या काही दिवसापासून चारचाकी दुचाकीचे भीषण अपघात झाल्याच्या घटना नियमितपणे समोर येत असताना मध्यप्रदेश राज्यातील देखील एक चारचाकी थेट कालव्यात पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश राज्यातील इंदोरनजीक असलेल्या एका कालव्यात चारचाकीच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे चारचाकी थेट कालव्यात पडल्याने मोठे दुर्घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ही घटना सिम्रोल घाट सेक्शनपासून १० किलोमीटर अंतरानजीक असलेल्या लुधिया कुंड येथे घडली आहे या अपघातात चारचाकी कारमध्ये १२ वर्षाची मुलगी बसलेली होती. कार कालव्यात पडत असताना मुलीच्या वडिलांनी मुलीच्या बचावासाठी तत्काळ तलावात उडी मारली. कार कालव्यात कोसळल्यानंतर अन्य काही लोकांनी या कालव्यात उडी मारली सुदैवाने मुलीला कुठलीही जीवित हानी झाली नाही पण तिला तिच्या वडिलांनी किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगितले आहे दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ही घटना रविवारी घडल्याचे समजते.