• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

फटफटीच्या काळजीपेक्षा शेतकरी व बैलजोडीची काळजी महत्वाची; पालकमंत्री गुलाबाराव पाटील

फुपनगरी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न ; फुपनगरी वासीयांच्या सत्काराने भारावलो

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
फटफटीच्या काळजीपेक्षा शेतकरी व बैलजोडीची काळजी महत्वाची; पालकमंत्री गुलाबाराव पाटील
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर । ७ नोव्हेबर २०२२
ग्रामपंचायतीचा सरपंच हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या जातीचाआहे यापेक्षा गावाच्या विकासासाठी तो किती सक्रीय आहे यावर गावाचा विकास अवलंबून असतो. जिल्ह्यात विकासकामे करीत असतांना मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. फटफटीच्या काळजीपेक्षा शेतकरी व बैलजोडीची काळजी महत्वाची असून त्यासाठी शेती रस्ते दर्जोन्नात करून शेतकरी हितासाठी शेत रस्ते डांबरीकरणावर अधिक भर दिलेला आहे. जनतेच्या प्रेमाला व विश्वासाला तडा जावू देणार नाही. विकास कामांच्या भरोसे जनतेसमोर जाणार असून फुपनगरी वासीयांच्या सत्काराने भारावलो असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फुपनगरी येथे आयोजित भव्य जाहीर सभेत केले.
मतदार सावकार तर लोकप्रतिनिधी कर्जदार .- पालकमंत्री
यावेळी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, माझ्यासाठी मतदार सावकार असून मी मतदारांच्या कामासाठी कर्जदार आहे. मतदार जाती – पाती पेक्षा कामांना महत्व देतो त्यामुळे फुपनगरीचा सत्कार कायमस्वरूपी स्मरणात राहील. लवकरच सा, बा. च्या एस आर मधून फुपनगरीगाव ते फुपनगरी फाटा पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणसाठी निधी मंजूर करणार असून परिसरातील उर्वरित रस्त्यांचे काम मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
सभेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
फुपनगरीत प्रवेश करताच हजारो गावकरी ना. गुलाबाराव पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. महिलांनी गावाच्या बसं स्थानाकांपासून ते कार्यक्रमस्थळा पर्यन्त आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा दिवे लावून रोषणाई केली होती. ठिक – ठिकाणीकाणी असंख्य महिलानी गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. जागोजागी स्वागत बॅनर लावण्यात आले होते., पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोषात व मोठ्या उत्साहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे ना. गुलाबराव पाटील भारावून गेले. सभेला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला हे विशेष
याप्रसंगी जि. प. चे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, पं. स.चे माजी सभापती जनार्दन कोळी- पाटील, फुपनगरीचे माजी सरपंच व आयोजक जितेंद्र अत्रे, सरपंच कु.प्रियंका सोनवणे, उपसरपंच महेश अत्रे, भास्कर सोनवणे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपसभापती सुरेश पाटील, संचालक अनिल भोळे, भरत बोरसे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, भाजपाचे प्रभाकर आप्पा पवार, पं. स. सदस्य हर्षल चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सचिन पवार, शेतकी संघाचे उत्तम सपकाळे, मच्छिंद्र पाटील मुरलीधर पाटील, जगदीश सपकाळे, नवल सोनवणे, अण्णाभाऊ सपकाळे, विलास चौधरी (किटू नाना), दिलीप जगताप परिसरतील सरपंच, उपसरपंच ,ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक माजी सरपंच जितेंद्र अत्रे, सरपंच कु. प्रियंका सोनवणे, उपसरपंच महेश अत्रे, भास्कर सोनवणे, ग्रा.पं. सदस्य युवराज पवार, अविनाश नेरकर, सौ. गुंफाबाई भालेराव, सौ. भारती सोनवणे, सौ. योगिता जाधव, राहुल जाधव, सौ. हेमलता जाधव, सुनील चव्हाण, सिताराम सपकाळे, किशोर अत्रे, सुजित अत्रे, रतिलाल बडगुजर, विजय चौधरी, दिग्विजय चौधरी, सतीश जाधव, उमाकांत मोतीराया, सागर भालेराव, भरत सोनवणे, दगडू चौधरी, उत्तम अहिरे, कबीर पटेल, तुराप शाह, हरी कांबळे यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.
या कामांचे झाले लोर्पण व भूमिपूजन
२ कोटी ४० लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात फुपनगरी ते वडनगरी रस्त्याचे पूलांसाह डांबरीकरण करणे (७६ लक्ष ), फुपनगरी ते दोनगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे (४२ लक्ष ), गाव अंतर्गत बडगुजर गल्लीत डांबरीकारण करणे (१० लक्ष) जल जीवन मिशन अंतर्गत पा. पू. योजना (२० लक्ष) तसेच पेव्हिंग ब्लोच्क बसविणे (३१ लक्ष ), मरिमाता मंदिरालगत नाल्याला संरक्षण भिंत बांधकाम करणे (१० लक्ष), फुपनगरी ते आंधळे शेत रस्त्याचे डांबरीकरण करणे (५० लक्ष) या कामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील सर यांनी केले. तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गावाचे माजी सरपंच तथा पॅनल प्रमुख जितेंद्र अत्रे यांनी सांगितले की, आजपर्यंत सर्वाधिक निधी ना. गुलाबराव पाटील यांनी दिला असून फुपनगरी ते फुपनगरी फाटा पर्यंत उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी करून कार्यक्रमाची सविस्तर माहिती विषद केली.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group